Navratri 2026: 5 Powerful Cinnamon Remedies for Wealth, Prosperity & Positive Energy

Navratri 2026 Reme dies
Navratri 2026: 5 Powerful Cinnamon Remedies for Wealth, Prosperity & Positive Energy

Navratri 2026: 5 Powerful Cinnamon Remedies for Wealth, Prosperity & Positive Energy

नवरात्रीमध्ये करा दालचीनीचे सटीक उपाय, धन, सुख-समृद्धी व सकारात्मक ऊर्जासाठी 

नवरात्रीमध्ये साधक माता दुर्गाची मनोभावे पूजा-अर्चा करून आपल्या परिवारांच्या सुख-शांती, सफलतासाठी प्रार्थना करून आशीर्वाद मागतात. आपल्याला माहीत आहे का? काही परंपरामध्ये दालचीनीला धन-समृद्धी व सकारात्मक संकल्पशी जोडले जाते.

आता नवरात्री हा उत्सव सुरू झाला आहे तर त्यामध्ये आपण दालचीनी वापरुन 5 पारंपारिक सटीक उपाय कसे करायचे ते पाहणार आहोत. आपण जे उपाय बघणार आहोत ते धार्मिक आस्था व लोकमान्यता वरती आधारित आहेत.

धन व समृद्धीसाठी दालचीनीचा उपाय: 

आपल्याला दालचीनीचा उपाय करण्यासाठी दालचीनीचे 2-3 छोटे तुकडे घ्यायचे आहेत. मग एक स्वच्छ लाल रंगाचे कापड घेऊन त्यावर दालचीनीचे तुकडे ठेवून माता दुर्गाच्या समोर बसून श्रद्धापूर्वक प्रार्थना करा. आर्थिक स्थिरता, सुख-समृद्धी व धनाचा योग्य उपयोग कसा करायचा त्यासाठी माता चा आशीर्वाद घ्या.  त्यानंतर दालचीनी आपण आपल्या घरातील पूजाच्या देव्हाऱ्यात एक संकल्पचे प्रतीक म्हणून ठेऊ शकता.

आपला व्यवसाय व नोकरीमध्ये सफलता मिळण्यासाठी दालचीनीचा उपाय: 

नवरात्रीचे नऊ दिवस पवित्र मानले जातात. तर आपण नऊ दिवसा पैकी कोणत्या सुद्धा एका दिवशी आपल्या हातात एक दालचीनीचा तुकडा घेऊन माता दुर्गाला आपला व्यवसाय किंवा नोकरी किंवा करियर मध्ये सफलता मिळण्यासाठी प्रार्थना करा. आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी मेहनत, नियम व आत्मविश्वास ठेऊन काम करण्याचा संकल्प करा.

आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यासाठी दालचीनीचा उपाय: 

आपल्याला एक दालचीनीचा तुकडा घेऊन आपल्या घरातील पूजाघरमध्ये ठेवायची आहे. जर तुमच्या घरात दिवा लावायची परंपरा असेलतर सुरक्षित जागी दिवा लावावा. मह आपण पुढे दिलेला मंत्र 11 वेळा म्हणावा.

मंत्र: ॐ दुं दुर्गायै नमः।

मी आपल्याला मंत्राचा अर्थ काय आहे ते सांगते. हा मंत्र माता दुर्गाला समर्पित व भावपूर्ण मंत्र आहे.

“ मी माता दुर्गाला नमस्कार करते/करतो व तिच्या कडून शक्ति, आशीर्वाद किंवा रक्षाची प्रार्थना करते/करतो.”

आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी दालचीनीचा उपाय: 

आता नवरात्री सुरू आहे तर नवरात्रीमध्ये कोणत्या सुद्धा दिवशी हा उपाय करता येतो. आपण माता दुर्गाच्या समोर शांतपणे बसायचे आहे. मग पूजा थालीमध्ये एक दालचीनीचा तुकडा ठेवा. मग आपले डोळे बंद करून आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा. मग पुढे दिलेला मंत्र 11 वेळा किंवा 21 वेळा शांतपणे म्हणा.

मंत्र:  ॐ दुं दुर्गायै नमः

मग शेवटी माता समोर बसून कृतज्ञता व्यक्त करा. व आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी व्यावहारिक प्रयत्न करण्याचा संकल्प करू शकता.

अष्टमी किंवा नवमी ह्या दिवशी दालचीनीचा सटीक उपाय: 

नवरात्रीमध्ये अष्टमी व नवमी हे दोन दिवस विशेष महत्वाचे मानतात. आपल्याला अष्टमी किंवा नवमी ह्या दिवशी दालचीनीचा उपाय करायचा आहे. आपण रोज

Navratri 2026 Reme dies
Navratri 2026: 5 Powerful Cinnamon Remedies for Wealth, Prosperity & Positive Energy

नियमित माता दुर्गाची पूजा करा. 

मह पूजा थालीमध्ये दालचीनीचा एक तुकडा ठेवून आपल्या परिवाराच्या सुख-शांती, समृद्धी व कल्याण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करा. तसेच आपल्या आयपती प्रमाणे कन्या पूजन करा, भोजन द्या व जरूरतमंद लोकांना दान करा.

मी आपल्याला एक महत्वाची टीप सांगणार आहे. दालचीनीचा उपाय करताना दालचीनी जाळणे आवश्यक नाही. दालचीनीचा धूर आपल्या श्वासोश्वासने आत घेणे टाळा.  त्याच बरोबर पूजा साहित्य आगी पासून सुरक्षित जागी ठेवा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा आपण धन प्राप्तीचे उपाय केले तर लगेच त्याचे फळ आपल्याला मिळत नाही काही काळ आपल्याला वाट पहावी लागते.

आपण कोणत्या उद्देशसाठी दालचीनीचा उपाय करणार आहात? 

धन, पैसा व धनाची वाढ होण्यासाठी, व्यवसाय व नोकरीमध्ये सफलता मिळण्यासाठी, घरात सुख-शांती व सकारात्मकता येण्यासाठी, आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी का प्रेम अ आकर्षणसाठी. आपण पहिले आपला कोणता उद्देश आहे तो ठरवावा मग नवरात्रीमध्ये दालचीनीचा उपाय करावा व मंत्र जाप करावा.

 

 

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.