Navratri 2026: 9 Forms of Goddess Durga – Powerful Mantras, Bhog & Auspicious Colours In Marathi

Navratri 2026
Navratri 2026: 9 Forms of Goddess Durga – Powerful Mantras, Bhog & Auspicious Colours

Navratri 2026: 9 Forms of Goddess Durga – Powerful Mantras, Bhog & Auspicious Colours

नवरात्रीमध्ये माताची 9 रूप कोणती? प्रसन्न करण्यासाठी खास मंत्र, भोग व रंग कोणते?

शारदीय नवरात्री माता दुर्गाची आराधना, शक्ति व उपासना व आत्म-शुद्धीचा परम पर्व आहे. ह्या वर्षी 11 ऑक्टोबर 2026 रविवार ह्या दिवसा पासून घटस्थापना होऊन नवरात्रीच्या पावन दिवसाची सुरुवात होणार असून 20 ऑक्टोबर 2026 मंगळवार ह्या दिवशी दसरा आहे. धार्मिक मान्यता अनुसार, नवरात्री मध्ये माता भगवतीची वेगवेगळ्या स्वरूपाची पूजा केल्याने साधकला भय, संकट, रोग, व बाधा पासून मुक्ती मिळते. त्याच बरोबर सुख-समृद्धी व सकारात्मक ऊर्जाचा वास होतो.

शारदीय नवरात्री माता दुर्गाची आराधना व शक्ति ची उपासना करण्याचे पर्व आहे. ह्या नऊ दिवसांत देवी माताच्या 9 विविध रूपांची पूजा केली जाते. भक्त आपल्या श्रद्धा नुसार व्रत ठेवून मंत्र जाप करतात व माताच्या आवडीचे मनपसंद भोग अर्पित करतात. असे म्हणतात की नवरात्री मध्ये मनापासून देवी मताची केलेली श्रद्धा व आराधना मनाला शांती मिळते व घरात सकारात्मकता नेहमी राहते. ह्या वर्षी शारदीय नवरात्री मध्ये 11 ऑक्टोबर पासून माताच्या 9 रूपांची पूजा सुरू होईल. नवरात्री मध्ये रोज नऊ दिवस देवीची वेगवेगळी रूप समर्पित आहेत. त्याच बरोबर विशेष रंगाचे कपडे परिधान करून वेगवेगळे भोग अर्पित करायची परंपरा आहे.

पहिला दिवस माता शैलपुत्रीची पूजा:
नवरात्री मध्ये पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीची पूजा केली जाते. ह्याला माता दुर्गाचे पहिले रूप मानले जाते. ह्या दिवशी ‘ॐ देवी शैलपुत्र्यै नमः’ ह्या मंत्राचा जाप केल्याने मनपसंद वर म्हणजेच नवरा मिळतो व विवाहित जीवन सुखी होते. पहिल्या दिवशी माताला शुद्ध तुपाचा भोग अर्पित केला जातो. ह्या दिवशी नारंगी रंगाचे वस्त्रचे विशेष महत्व आहे.

दूसरा दिवस माता ब्रह्मचारिणी का ध्यान करावे:
दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचारिणी ची आराधना करतात. ह्या दिवशी ‘ॐ देवी ब्रह्मचारिण्यै नमः ह्या मंत्राचा जाप करतात. माता ब्रह्मचारिणी ची पूजा आराधना केल्याने जीवनातील सर्व कष्ट व बाधा दूर होतात. हिची पूजा केल्याने जीवनातील तपस्या, संयम व दृढ संकल्प ची पूर्ति होते. माताला साखरेचा भोग अर्पित करण्याची परंपरा आहे. ह्या दिवशी पांदऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे.

तिसरा दिवस माता चंद्रघंटाची पूजा:
तिसरा दिवस माता चंद्रघंटाची पूजा केली जाते. भक्त ह्या दिवशी ‘ॐ देवी चन्द्रघण्टायै नमः’ ह्या मंत्राचा जाप करू शकतात. माताच्या ह्या रूपाची पूजा व मंत्र जाप केल्याने साहस, शांती, समृद्धी व मोक्षची कामना पूर्ण होते. माता चंद्रघंटाला दुधाची खीरचा भोग अर्पित करतात. ह्या दिवशी लाल रंग परिधान करणे शुभ मानले जाते.

चौथा दिवस माता कूष्मांडाला मालपुवा चा भोग अर्पित करा:
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी माता कूष्मांडाची पूजा केली जाते. ह्या दिवशी ॐ देवी कूष्माण्डायै नमः ह्या मंत्राचा जाप केल्याने आयुष्य, यश, बल व आरोग्यचा आशीर्वाद मिळतो. चौथ्या दिवशी माता कूष्मांडाला मालपुवाचा भोग अर्पित करण्याची परंपरा आहे. ह्या दिवशी शाही नीला रंग परिधान करण्याची परंपरा आहे.

पाचवा दिवस माता स्कंदमाताची आराधना:
पाचव्या दिवशी माता स्कंदमाताची पूजा केली जाते. ह्या दिवशी ॐ देवी स्कन्दमातायै नमः’ ह्या मंत्राचा जाप करा. संतान प्राप्ती व संतान सुख समृद्धीच्या साठी माता स्कंदमाताचे ध्यान करणे सर्वात फलदायी आहे. ह्या दिवशी स्कंदमाताला केळ्याचा भोग दाखवला जातो. ह्या दिवशी पिवळा रंग परिधान करण्याची परंपरा आहे.

साहवा दिवस माता कात्यायनीची पूजा:
सहाव्या दिवशी माता कात्यायनीची आराधना केली जाते. भक्त ‘ॐ देवी कात्यायन्यै नमः’ ह्या मंत्राचा जाप करू शकतात. माता कात्यायनी विवाह मध्ये केणारे अडथळे दूर करते. व आपल्या पसंद नुसार वर प्रदान करते. ह्या दिवशी माताला मध चा भोग अर्पित करण्याची परंपरा आहे. ह्या दिवशी हिरवा रंग परिधान करणे चांगले मानले जाते.

सातवा दिवस माता कालरात्रीची उपासना:
सातव्या दिवशी माता कालरात्रीची पूजा केली जाते. देवीचे हे रूप उग्र मानले जाते. पण भक्तांना शुभ फळ देणारी देवी मानले जाते. ह्या दिवशी ‘ॐ देवी कालरात्र्यै नमः’ह्या मंत्राचा जाप करून गुळाचा भोग दाखवावा. ह्या दिवशी स्लेट रंग परिधान करावा. माता कलरात्री संकट, भय, अज्ञान व नकारात्मक ऊर्जा दूर करून जीवनात शांती प्रदान करते.

Navratri 2026
Navratri 2026: 9 Forms of Goddess Durga – Powerful Mantras, Bhog & Auspicious Colours

आठवा दिवस माता महागौरी म्हणजेच माता पार्वती नारळचा भोग:
अष्टमी च्या दिवशी माता पार्वती म्हणजेच महागौरीची पूजा केली जाते. ह्या दिवशी ॐ देवी महागौर्यै नमः ह्या मंत्राचा जाप करा. ह्या दिवशी माता शृंगार करते. माताचे हे रूप शांतिप्रिय आहे. माता गौरीची पूजा केल्याने नआवडणारा जीवनासाठी मिळतो. महागौरीला ह्या दिवशी नाराळाचा भोग अर्पित करणे शुभ आहे. ह्या दिवशी हिरवा व पिवळा रंग परिधान करणे शुभ आहे.

नववा दिवस माता सिद्धिदात्री ची आराधना:
नवरात्रीच्या नवव्या दिवशी माता सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. ह्यांना नवदुर्गा मतांचे नववे स्वरूप मानले जाते. ह्या दिवशी ‘ॐ देवी सिद्धिदात्र्यै नमः’ ह्या मंत्राचा जाप केल्याने संसारीक व आध्यात्मिक मनोकामना पूर्ण होतात. ह्या दिवशी माता ला तिळाचा भोग अर्पित करण्याची परंपरा आहे. नवव्या दिवशी मोरपंखी हिरवा रंग परिधान करण्याची परंपरा आहे. माताची पूजा करताना चूक-भूल ची माफी मागण्याची प्रार्थना केली जाते.

 

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.