मुलांच्या लग्नाला उशीर होतोय? श्रावणात करा हे 5 सोपे उपाय | मनासारखा जीवनसाथी मिळण्यासाठी उपाय
Children’s Marriage Delayed? Try These 5 Powerful Shravan Remedies for a Suitable Life Partner
आपण आपल्या मुलासाठी किंवा मुलीसाठी लग्नाच्या विचारात आहात व वर-वधू शोधत आहात, आपल्याला मनासारखा वर किंवा वधू मिळत नाही. त्यामुळे लग्नाला उशीर होत आहे. तर आता श्रावण महिना सुरू झाला आहे तर आपल्या मुलांच्या विवाहातील अडचणी दूर करण्यासाठी काही सोपे सटीक उपाय करा.
विवाह म्हणजे व्यक्तीच्या जीवनातील सर्वात महत्वपूर्ण विषय आहे. पण काही मुला मुलींना योग्य जीवनसाथी मिळण्यास खूप त्रास सहन करावा लागतो किवा बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. काही वेळेस ग्रह दोष मुळे उशीर होतो किंवा काही कर्म संबंधित कारणे सुद्धा असू शकतात. त्यामुळे चिंता व निराशा पदरी पडते.
आज काल प्रतेक मुलगा किंवा मुलगी आपल्या करियरच्या मागे असतो व आजकाल करियर करणे म्हणजे खूप कठीण काम आहे कारणकी खूप कॉम्पिटिशन सुद्धा आहे व आपली नोकरी टिकवून धरण्यासाठी खूप कष्ट सुद्धा करावे लागतात मग त्यामुळे विवाह करण्यास उशीर होतो. व आपल्या मनासारखा जोडीदार मिळत नाही.
पण चिंता करू नका श्रावण महिना हा माता पार्वती व भगवान शिव ह्यांना समर्पित आहे आपण जर माता पार्वती व भगवान शिव ह्यांचे काही उपाय करणे अत्यंत शुभ मानले जाते. शास्त्रा नुसार असे म्हणतात की श्रावण महिन्यात माता पार्वती व भगवान शिव ह्यांचे उपाय केलेतर त्याचे शुभ फळ प्राप्त होऊन त्यांची कृपा मिळते. तसेच मनोभावे केलेली पूजा अर्चा त्यामुळे विवाहातील अडचणी दूर होण्यास मदत होते व विवाह लवकर ठरून चांगला जोडीदार मिळतो.
श्रावण महिन्यात भगवान महादेव व माता गौरी ह्यांचे सोपे उपाय केल्यास वैवाहिक सुख मिळते.
माता पार्वतीची पूजा करून त्यांचे शक्तिशाली मंत्र जाप करा:
श्रावण महिन्यात माता पार्वतीची पूजा करणे अत्यंत प्रभावशाली मानले जाते. करणकी, माता पार्वतीनी भगवान शिव ह्यांना पतीच्या रूपात स्वीकारण्यासाठी कठोर तपस्या केली होती. श्रावण महिन्यात माता पार्वतीला रोज लाल कुंकू, लाल बांगड्या व लाल बिंदी अर्पित करून ॐ ह्रीं गौर्यै नमः मंत्र चा 108 वेळा जाप करा.
शिव-पार्वती विवाह कथा आइका:
श्रावण महिन्यात रोज किंवा सोमवारी तरी शिव-पार्वती विवाह कथा आइका. त्यामुळे फक्त शांतीच मिळत नाही तर नकारात्मक ऊर्जा व विवाह मधील येणाऱ्या अडचणी दूर होतात .
अविवाहित मुलांनी कांवड सेवा केली पाहिजे:
जर आपले स्वास्थ व परिस्थिति अनुकूल असेलतर अविवाहित मुलीनी श्रावण महिन्यात कांवड आणून भगवान शिव ह्याच्या वर गंगाजल अर्पित केले पाहिजे अशी तपस्या केल्याने भगवान शिव ह्यांची कृपा प्राप्त होऊन भगवान शिव ह्यांच्या सारखा गुणी व समर्पित जीवनसाथी मिळतो.

रुद्राभिषेक जरूर करा किंवा त्याचे नियोजन करा:
भगवान शिव ह्यांना प्रसन्न करून विवाह संबंधित दोष दूर करण्यासाठी रुद्राभिषेक करणे अत्यंत प्रभावी मानले जाते. आपण पुजारी कडून करून घेवू शकता किंवा स्वतः श्रद्धेने व मंत्र जाप करीत करू शकता.
प्रतेक गुरुवारी गाईची सेवा करा:
शास्त्रा नुसार गौ माता मध्ये सर्व दिवे देवतानाचा वास असतो. गाईची सेवा करणे अत्यंत शुभ मानले जाते. श्रावण महिन्यात प्रतेक गुरुवारी गाईला हिरवा चारा व गूळ-रोटी खायला द्या. गुरुवार हा दिवस भगवान विष्णु व बृहस्पति (गुरु) शी जोडला गेलेला आहे ज्योतिष शास्त्रा नुसार हे दोन्ही महत्वपूर्ण आहेत. हे विनम्र कार्य सकारात्मक कर्मा ला उतेजीत करते व विवाह संबंधित ग्रह मजबूत करते व देवी कृपा प्राप्त होते.
