15 जुलै 2026 शक्ति साधनाचा महापर्व गुप्त नवरात्री, मनोकामना पूर्ति होण्यासाठी माताची करा आराधना
Ashadha Gupt Navratri 2026 Starts on 15 July | Kalash Sthapana Muhurat | Worship Maa Durga for Wishes Fulfillment
आषाढ गुप्त नवरात्री 15 जुलै 2026 बुधवार ह्या दिवसापासून सुरू होत आहे, ह्यामध्ये देवी माताची उपासना व शक्ति साधना करणे विशेष महत्वाचे आहे.
सनातन परंपरानुसार गुप्त नवरात्रीमध्ये देवीची उपासना, शक्ति साधना व आत्मशुद्धीचे विशेष पर्व मानले जाते. संपूर्ण वर्षात येणाऱ्या चार नवरात्री मध्ये चैत्र, व शारदीय नवरात्री सर्वांसाठी मुख्य मानली जाते. तसेच माघ व आषाढ मध्ये येणारी गुप्त नवरात्री ही साधना करणारे, उपासना करणारे व तांत्रिकी साधना करणारे ह्यांच्यासाठी फलदायी मानली जाते.
आषाढ गुप्त नवरात्री ह्या वर्षी 15 जुलै 2026 बुधवार पासून प्रारंभ होत असून 23 जुलै 2026 गुरुवार ह्या दिवशी समाप्त होत आहे.
आषाढ शुक्ल प्रतिपदा तिथी आरंभ 14 जुलै दुपारी 3:14 वाजता होत असून 15 जुलै दुपारी 11:52 वाजे पर्यन्त आहे.
कलश स्थापना शुभ मुहूर्त 15 जुलै सकाळी 5:33 ते 10:09 पर्यन्त आहे. ह्या वेळेत विधीपूर्वक कलश स्थापना करून माता भगवती ला आव्हान करणे अत्यंत शुभ मानले जाते.
आषाढ गुप्त नवरात्री मध्ये माता दुर्गाच्या गुप्त स्वरूपाच्या बरोबर दशमहाविद्या देवीची आराधना केली जाते. माता काली, तारा, षोडशी, भुवनेश्वरी, भैरवी, छिन्नमस्ता, धूमावती, बगलामुखी, मातंगी और कमला महाविद्याची साधना केल्याने साधकाला आध्यात्मिक ऊर्जा, आत्मबल व दिव्य कृपा प्राप्त होते.

धार्मिक मान्यता अनुसार श्रद्धा, संयम, व पूर्ण निष्ठाने केलेली पूजा अर्चा धन, समृद्धी, सौभाग्य, ऐश्वर्य, यश, शत्रुवर विजय, मनोकामना सिद्धी तथा देवीची विशेष कृपा प्राप्त होते.
गुप्त नवरात्री साधना, पूजा व मनोकामना पूर्ण करणारे पर्व मानले जाते. ह्यामध्ये माता दुर्गाच्या नऊ स्वरूपांची बरोबर दसमहाविद्याची सुद्धा आराधना केली जाते. ह्या वर्षी गुप्त नवरात्रीची सुरुवात 15 जुलै पासून सुरू होत असून पहिल्या दिवशी गुरु व चंद्रमाची युतीने लक्ष्मी नारायण योग बनत आहे जो खूप शुभ संयोग आहे. हा योग नेहमी नेहमी येत आहे.
गुप्त नवरात्री केवळ अनुष्ठानचे पर्व नाही तर आत्मचिंतन, इंद्रिय संयम व अंतर्मनला जागृत करण्याचा अवसर आहे. ह्या नऊ दिवसांत साधक सात्विक जीवन, जप, तप, ध्यान व देवीची आराधना करून आपल्या शरीरात सकारात्मक ऊर्जा संचार करण्याचा चांगला अवसर आहे.
माता भगवतीची उपासना केल्याने नकारात्मक शक्तिचा क्षय होतो. व जीवनात सुख,शांती व समृद्धीचा मार्ग खुला होतो.
गुप्त नवरात्रिच्या प्रथम दिवशी सकाळी 8 वाजता कलश स्थापना करून माता भगवतीला आव्हान करावे. मग रोज नऊ दिवस दुर्गा सप्तशती चे पठन करून विशेष पूजा, आरती व देवी स्तुतिचे आयोजन करावे.
。
