Adhik Maas 2026 | Start & End Date, Significance, Do’s & Don’ts | Purushottam Month Explained

Adhik Maas 2026
Adhik Maas 2026 | Start & End Date, Significance, Do’s & Don’ts | Purushottam Month Explained

Adhik Maas 2026 | Start & End Date, Significance, Do’s & Don’ts | Purushottam Month Explained

अधिक मास 2026 | कधी सुरू होणार? काय करावे व काय टाळावे | पुरुषोत्तम मास संपूर्ण माहिती

सन 2026 ह्या वर्षी अधिक मास सुरू होणार आहे. ह्या महिन्यात कोणती सुद्धा शुभ कार्य केली जात नाहीत. आपण आता पाहूया अधिक मास कधी सुरू होणार व कधी संपणार व त्याचे महत्व काय आहे.

हिंदू पंचांग अनुसार दर 3 वर्षांनी अधिक महिना म्हणजेच धोंडयाचा महिना येतो. ह्या वर्षी 17 मे 2026 रविवार ह्या दिवशी अधिक महिना सुरू होत असून 15 जुन सोमवार ह्या दिवशी समाप्ती होत आहे. ह्या कालाय सूर्य एका राशी मधून दुसऱ्या राशी मध्ये प्रवेश करीत नाही. म्हणून ह्यालाच अधिक मास, मलमास किंवा पुरुषोत्तम मास असे म्हणतात. हा महिना धार्मिक दृष्टीने खूप खास मानला जातो. पण मंगल कार्य करण्यासाठी वर्जित आहे. ह्या काळात विवाह, मुंज, गृह प्रवेश किंवा नामकरण केले जात नाही. अधिक मास हा भगवान विष्णु ह्यांना समर्पित आहे. त्यामुळे ह्या काळात भगवान विष्णुची भक्ति, दान-पुण्य व आत्मचिंतन करण्यासाठी खूप श्रेष्ट मानला आहे.

अधिक मास का येतो?
हिंदू कालगणना ही सूर्य आणि चंद्र यांच्या हालचालींवर आधारित आहे.
सूर्य वर्ष = 365 दिवस
चंद्र वर्ष = 354 दिवस
➡️ दरवर्षी 11 दिवसांचा फरक पडतो

हा फरक भरून काढण्यासाठी साधारणतः 32 महिने 16 दिवसांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो, त्यालाच अधिक मास म्हणतात. ह्या वर्षी खास असे आहे की अधिक मास मध्ये जेष्ट मास पण आहे. त्यामध्ये अधिक मास हा 30 दिवसांच्या आयवजी 60 दिवसांचा आहे.

अधिक मास मध्ये कोणत्या काम करू नये:
अधिक मास शुभ कार्य करण्यासाठी उपयुक्त नाही. ह्या काळात विवाह केल्यास जीवनात अडचणी वाढू शकतात. नवीन घरात प्रवेश, भूमी पूजन किंवा प्रॉपर्टी संबंधित निर्णय घेऊ नयेत. त्याच बरोबर मुंज, साखरपुडा, असे धार्मिक संस्कार सुद्धा करणे टाळावे. नवीन व्यवसाय, दुकान, शोरूमचे उद्घाटन सुद्धा करू नये, नाहीतर आर्थिक नुकसान होऊ शकते. म्हणजेच ह्या काळात कोणत्या सुद्धा चांगल्या कामाची सुरुवात करू नये.

अधिक मास मध्ये काय काय करावे?
अधिक मास भगवान विष्णु ह्यांना समर्पित आहे, ह्या मध्ये भगवान विष्णु ह्यांची पूजा करणे फलदायी आहे. रोज “ॐ नमो भगवते वासुदेवाय” ह्या मंत्राचा जास्तीत जास्त जाप करावा. त्यामुळे मानसिक शांती मिळून जीवनात सकारात्मकता येईल. त्याच बरोबर विष्णु सहस्त्रनाम, विष्णु चालीसा, श्रीमद्भागवत ह्याचे पठन करणे शुभ आहे. दान-पुण्य करणे विशेष महत्वाचे आहे. जरूरत मंद लोकांना अन्न, जल, वस्त्र व फळ, पुस्तक दान करावी. तसेच शक्य असेलतर पवित्र नदीमध्ये स्नान करावे. किंवा घरात अंघोळीच्या पाण्यात गंगाजल घालून स्नान करावे. त्याच बरोबर आत्मशुद्धी व आध्यात्मिक उन्नती करणे शुभ मानले जाते. आवल्याच्या झाडाच्या खाली बसून जेवण करावे.

Adhik Maas 2026
Adhik Maas 2026 | Start & End Date, Significance, Do’s & Don’ts | Purushottam Month Explained

अधिक मास मध्ये 33 वस्तु दान कराव्या कारणकी 33 कोटी देव आहेत म्हणून 33 वस्तु दान कराव्या. ह्या महिन्यात मुलीला व जावयाला घरी जेवायला बोलवावे 33 अनारसे द्यावे, जावई म्हणजे लक्ष्मी नारायणचे रूप मानले जाते.

अधिक मास मध्ये कोण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या:
अधिक मास मध्ये तामसी भोजन म्हणजेच कांदा-लसूण वापरू नये व सात्विक भोजन सेवन करावे. त्याच बरोबर खोटे बोलू नये, कोणाचा अपमान करू नये, चुकीची कामे करू नये, असे केल्याने पुण्य मिळते व आध्यात्मिक प्रगती सुद्धा होते.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.