Basant Panchami | Saraswati Puja 2022 Date, Puja Vidhi, Mantra And Upaay For Vidyarthi In Marathi

Basant Panchami Saraswati Puja 2022
Basant Panchami Saraswati Puja 2022 Date Puja Vidhi Mantra And Upaay For Vidyarthi

बसंत पंचमी सरस्वती पूजा 2022 तारीख पूजा विधी व विद्यार्थीसाठी उपाय 

बसंत पंचमी सरस्वती पूजन 5 फेब्रुवारी 2022 पूजा शुभ मुहूर्त 5 तास 28 मिनिट आहे.

5 फेब्रुवारी 2022 शनिवार ह्यादिवशी बसंत पंचमी सरस्वती पूजन खूप मनपूर्वक साजरे केले जाते. हिंदू पंचांगनुसार माघ महिन्यात शुक्ल पक्ष पंचमी ह्या तिथीला बसंत पंचमी उत्साहात साजरी केली जाते. ह्या दिवशी देवी सरस्वतीची पूजा अर्चा विधीपूर्वक केली जाते. असे म्हणतात की बसंत पंचमी ह्या दिवशी माता सरावतीची मनोभावे पूजा अर्चा केल्यास ती लवकर प्रसन्न होते.

The Basant Panchami Saraswati Puja 2022 Date Pooja Vidhi Mantra And Upaay For Students can be seen on our YouTube Basant Panchami Saraswati Puja 2022

बसंत पंचमी ह्या उत्सवाला सरस्वती पूजा, वागीश्वरी जयंती, रति काम महोत्सव, बसंत उत्सव ह्या नावांनी सुद्धा उळखले जाते. असे म्हणतात की बसंत पंचमी ह्या दिवशी बुद्धि, ज्ञान व विवेकची जननी माता सरस्वती प्रगट झाली होती. म्हणूनच ह्या दिवशी सरस्वती माताची पूजा अर्चा करतात. तसे पाहिले तर बऱ्याच कारणांसाठी सरस्वती माताची पूजा अर्चा करतात पण खास बसंत पंचमी ह्या दिवशी पूजा अर्चा करण्याचे महत्व अधिक आहे.

आता आपण पाहूया बसंत पंचमी ह्या दिवशी माता सरस्वतीची पूजा अर्चा व मंत्र काय आहे.

Basant Panchami Saraswati Puja 2022
Basant Panchami Saraswati Puja 2022 Date Puja Vidhi Mantra And Upaay For Vidyarthi

सरस्वती पूजा शुभ मुहूर्त 2022 (Saraswati Puja Shubh Muhurat Time 2022)
ह्या वर्षी 5 फेब्रुवारी 2022 शनिवार ह्या दिवशी बसंत पंचमी आहे.
पूजा मुहूर्त: सकाळी 7 वाजून 19 मिनिट दुपारी 12 वाजून 35 मिनिट पर्यन्त

सरस्वती पूजा विधि (Saraswati Puja Vidhi 2022)
बसंत पंचमी ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पूजेचा संकल्प करा. ह्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा.
मग पूजाची जागा स्वच्छ करून गंगाजल शिंपडून पूजा आरंभ करा. चौरंग स्थापित करून पिवळ्या रंगाचे वस्त्र चौरंगावर घालून माता सरस्वतीचा फोटो किंवा मूर्ती स्थापित करा.
माता सरस्वती ला पिवळा रंग अतिप्रिय आहे त्यामुळे पिवळे वस्त्र, पिवळे चंदन, पिवळे फूल, पिवळा रंगाचा भोग, हळद, अक्षता व केशर अर्पित करा.
मग भोग म्हणजेच नेवेद्य अर्पित करून सरस्वती माताची आरती व मंत्र जाप करा.

देवी माता सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी मंत्र:
माता सरस्वती बीज मंत्र:
ॐ ऐं ऐं ऐं महासरस्वत्यै नम:

सूर्य देवता मंत्र:
ॐ घृणि सूर्याय नम:

भगवान विष्णु मंत्र:
ॐ पालनहाराय विष्णुवे विद्यारूपाय नम:।

बसंत पंचमी ह्या दिवशी विद्यार्थीनी माता सरस्वतीची पूजा अर्चा केल्यास सफलता मिळते
माता सरस्वतीची पूजा अर्चा केल्यास जे विद्यार्थी अभ्यासात कमजोर म्हणजेच वीक आहेत त्यांच्या बुद्धीमध्ये वाढ होते तसेच त्यांच्या अभ्यासात मन लागते व त्यांना यश मिळते.

माघ महिन्यात शुक्ल पक्ष बसंत पंचमी ह्या दिवशी ज्ञान, वाणी, बुद्धि, विवेक, विद्या व सर्व कलानि अवगत परिपूर्ण माता सरस्वती ची पूजा अर्चा करतात ह्या दिवशी शिक्षा व कला संबंधित लोकांसाठी हा दिवस महत्वपूर्ण आहे. ह्या दिवशी लहान मुलांना पहिले अक्षर लिहायला शिकवले जाते. त्यामुळे जीवनभर माता सरस्वतीची कृपा त्यांच्यावर राहते. त्याना शिक्षणात सफलता मिळते जे मूल अभ्यासात कमजोर आहेत त्यांच्यावर माता सरस्वतीची कृपा राहून त्यांची प्रगती होते.

बसंत पंचमी ह्या दिवशी विद्यार्थीनि काही सोपे उपाय केले तर त्याना यश नक्की मिळेल.
बरेच वेळा आपल्या घरात वास्तूदोष असतो. त्यामुळे विद्यार्थिचे अभ्यासात लक्ष लागत नाही. म्हणून मूल जेथे अभ्यास करतात ती जागा किंवा दिशा किंवा त्यांचे अभ्यास करताना तोंड कोणत्या दिशेला आहे ते सुद्धा महत्वपूर्ण आहे.

पूर्व, उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशा ध्यान व शांतिची दिशा मानली जाते. ह्या दिशेला सकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात असते. तसेच अभ्यासाची खोली सुद्धा ह्या दिशेला असल्यास उत्तम आहे किंवा अभ्यास करताना पूर्व उत्तर ह्यादिशेला तोंड पाहिजे.

अभ्यासाचे टेबल उत्तर दिशेला असणे चांगले आहे. त्यामुळे मुलांचे लक्ष आपल्या करियरवर जास्त केंद्रित होते. पुस्तकांची मांडणी पूर्व उत्तर ह्या दिशेला हवी.

बसंत पंचमी ह्या दिवशी विद्यार्थीनि पांढरे किंवा पिवळे वस्त्र परिधान करावे व उत्तर पूर्व ह्या दिशेला बुद्धीची देवता श्री गणेश व शिक्षाची देवी माता सरस्वतीची प्रतिमा ठेवावी. माता सरस्वतीची पूजा अर्चा करताना पिवळे फूल, पिवळ्या रंगाची मिठाई किंवा खीर अर्पित करावी. व पिवळ्या रंगाचा म्हणजेच चंदनाचा किंवा केशरचा टिळा लावावा. पूजेच्या ठिकाणी वाद्य यंत्र व पुस्तक ठेवावी. त्यामुळे व्यक्तिला माता सारवस्तीची कृपा,ज्ञान, बुद्धि, विवेक च्या बरोबर विज्ञान, कला व संगीतमध्ये कामयाबी मिळते. तसेच ह्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र चंदनचा टिळा लावून कोणाला भेट म्हणून द्यावे.

जर कोणत्या विद्यार्थीचे अभ्यासात लक्ष लागत नसेलतर त्यांनी खाली दिलेला मंत्र उत्तर दिशेला तोंड करून बसून म्हणावा
‘ॐ ऎं सरस्वत्यै ऎं नमः’

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.