Mahamari Sathi Shaktishali Vishnu Mantra in Marathi

Mahamari Sathi Vishnu Mantra
Mahamari Sathi Shaktishali Vishnu Mantra

महामारी किंवा दूसरा कोणता रोगबरा होण्यासाठी व मनशांती मिळण्यासाठी सोपा मंत्र

सध्या महामारीने नुसते थैमान घातले आहे व अजून दुसरे रोग बरे होण्यासाठी प्रथम आपले मन शांत करून आपण वैद्यकीय उपचार घेण्याबरोबर देवाचा सुद्धा धावा केला पाहिजे जेणे करून आपला रोग बरा होवून आपण लवकर बरे होऊ.

सारे जग परेशान आहे लाखो लोक महामारीने ग्रासले आहेत तेव्हा आपण आपले विचार सकारात्मक ठेवून तसेच देवावर विश्वास ठेवून पुढे पाऊल उचलायला पाहिजे.

Mahamari Sathi Vishnu Mantra
Mahamari Sathi Shaktishali Vishnu Mantra

आपण ह्या विडीओमध्ये भगवान श्री विष्णु ह्याचा 9 अक्षरी मंत्र व त्याची जाप करायची पद्धत बघणार आहोत. भगवान श्री विष्णु ह्यांचा हा अगदी प्रभावी व शक्तीशाली मंत्र आहे.

आपल्याला समुद्र मंथन हयही कहाणी माहीत असेल. तर समुद्र मंथनच्या कहाणीशी ह्या मंत्रची तुलना केली आहे. समुद्र मंथन सुरू असताना श्री धनवंतरी भगवान प्रकट झाले. आपल्याला माहीत असेलच भगवान श्री धनवंतरी हिंदू धर्ममध्ये आरोग्य, आयुर्वेद, चिकिस्सा व औषधांची देवता आहे. भगवान श्री धनवंतरी म्हणतात की भगवान श्री विष्णु ह्याचा हा प्रभवी मंत्र म्हंटला की रोग नष्ट होतात. पण आपल्या औषध उपचारा बरोबर आपल्याला दैवी साथ सुद्धा म्हंत्वाची आहे.

विडियोमध्ये भगवान श्री विष्णु हांचा मंत्र त्यांच्या तीन नावावर आधारीत आहे. हा मंत्र प्रयोग करण्यासाठी 4 विविध पद्धती आहेत. तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल त्याचा अवलंब तुम्ही करू शकता. चारही पद्धती खूप सोप्या आहेत तसेच हा मंत्र प्रयोग कोणी सुधा करू शकतो.

मंत्र अश्या प्रकारे आहे.
ॐ अच्युताय नमः ||
ॐ गोविंदाय नमः ||
ॐअनंताय नमः ||

मंत्र प्रयोग करण्यासाठी चार विधी अथवा पद्धती आहेत
पहिली पद्धत अशी आहे.
ज्या दिवसा पासून मंत्र प्रयोग करायचा आहे त्या दिवासापासून सकाळी लवकर उठावे स्वच्छ कपडे घालून एका वाटीत अथवा छोट्या भांड्यात पाणी घेवून एक चमचापण घ्यावा. मग उजव्या हातात एक चमचा पाणी घेवून “ॐ अच्युताय नमः” म्हणून पाणी प्यावे. परत हातात पाणी घ्यावे व “ॐ गोविंदाय नमः” म्हणून पाणी प्यावे. परत हातात पाणी घ्यावे व ” ॐअनंताय नमः” म्हणून पाणी प्यावे.

मंत्र प्रयोग करतांना एक लक्षात ठेवा की पाणी पिताना चमचा किंवा हात ओठाला लागता कामा नये. भगवान श्री विष्णु ह्यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून हा प्रयोग आपल्याला रोज सकाळी एकदा करायचा आहे.

दुसरी पद्धत अशी आहे.
एक नवीन कोरी वही व पेन घेवून रोज सकाळी 108 वेळा हा मंत्र लिहायचा. पण मंत्र लिहण्याच्या आगोदर एक संकल्प करायचा की हा प्रयोग कीती दिवस करायचा आहे समजा 30 दिवस करायचे ठरवले तर 30 दिवस 108 वेळा मंत्र लिहून 30 दिवस झाल्यावर मंत्र लिहिलेली वही देवघरात ठेवा किंवा दुसरीकडे कुठे स्वच्छ जागेवर ठेवा.

तिसरी पद्धत अशी आहे.
रोज सकाळी उठल्यावर स्नान केल्यावर मंत्र 15 ते 30 मिनिट म्हणायचा किंवा आपल्याला शक्य असेल तेव्हडा वेळ म्हणायचा.

चौथी पद्धत अशी आहे.
मंत्र दिवसभर म्हणजे उठता बसता किंवा झोपताना जागेपाणी सारखा म्हणत राहायचा.

चारही पद्धती खूप सोप्या आहेत. आपण आपल्या परीवारातील व्यक्तीसाठी किंवा दुसर्‍या व्क्ती साठी सुद्धा करू शकता. फक्त एक संकल्प करून चालू करा. तुम्हाला नक्की यश मिळेल व भगवान श्री विष्णु नक्की आपल्याला रोगापासून मुक्त करायला मदत करतील.

मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इछीते की मंत्र प्रयोग करताना त्याच बरोबर आपले औषध उपचार पण चालू ठेवा. मंत्र जाप केल्याने आपल्याला मनशांती मिळेल व आपली विचारशक्ति सकारात्मक होईल.

The Marathi language video of this Vishnu Mantra for pandemics and epidemics can be seen here – Most Powerful Mantra for Pandemics and Epidemics

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.