Categories
Dessert Recipes Recipes in Marathi Sweets Recipes

Delicious Sweet Shakre Pongal Recipe in Marathi

शक्रे पोंगल (खिरीचा दक्षिणात्य प्रकार) : ह्या आगोदर आपण बऱ्याच प्रकारचे खिरीचे प्रकार पाहिले शक्रे पोंगल ही एक दक्षिण विभागात बनवण्यात येणारी स्वीट डीश आहे. शक्रे पोंगल बनवतांना तांदूळ, मुगाची डाळ, चण्याची डाळ, गुळ व नारळ वापरला आहे. शक्रे पोंगल ही खीर जरी दक्षिण भागात बनवत असले तरी महाराष्टात सुद्धा लोकप्रिय आहे,

बनवण्यासाठी वेळ:
वाढणी: ४ जनासाठी

साहित्य:
२ कप तांद्ळ
१/२ कप मुगाची डाळ
१/४ कप चण्याची डाळ
१ १/२ कप गुळ
१ नारळ
मीठ चवीने
वेलचीपूड चवीने
१ टे स्पून तूप

Delicious Sweet Shakre Pongal
शक्रे पोंगल (खिरीचा दक्षिणात्य प्रकार)

कृती:
मुगाची डाळ थोडी भाजून घ्या. चणाडाळ तांबूस रंगावर भाजून घ्या. नंतर तांदूळ, चणाडाळ, मुगडाळ व पुरेसे पाणी कुकरमध्ये घालून शिजवून घ्या. नारळ खोवून वाटून घ्या.

तांदूळ व डाळी शिजल्यावर त्या घोटून घ्या. किंचित मीठ घालून व वाटलेला नारळ घालून त्यात आवडीप्रमाणे गुळ घालून परत शिजवून घ्या. शिजताना वेलचीपूड व तूप घालून मिक्स करून घ्या.

गरम गरम शक्रे पोंगल सर्व्ह करतांना वरतून ड्रायफ्रुट ने सजवा.

Share this Article

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *