Sakal Cooking Competition Arunodaya Society, Parvati, Pune

Prize Distribution
Cooking Competition Prize Distribution

सकाळ न्यूजपेपर समुहा तर्फे श्री जाधव व त्यांचे सहकारी यांनी रविवार दिनांक २७ मे २०१८ रोजी दुपारी ४:३० वाजता अरुणोदय को-ऑपरेटीव्ह हौसिग सोसायटी, पर्वती, पुणे येथे महिलांच्या करीता पाक कला स्पर्धा आयोजित केली होती. तसेच पाककला स्पर्धेचे नियोजन छान करण्यात आले होते. सकाळ समूह नेहमी विविध महिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करीत असतात. पण महिलांचा सर्वात आवडतीचा विषय म्हणजे विविध पदार्थ बनवणे व ह्या विविध पदार्थ बनवण्याच्या स्पर्धा ठेवल्या तर महिला अगदी खुश होतात.

अरुणोदय को-ऑपरेटीव्ह हौसिग सोसायटी मधील जवळ जवळ ३० महिलांनी पाककला स्पर्धेत भाग घेतला होता. त्यानी नाना विध अगदी चवीस्ट पदार्थ बनवले होते. ह्या स्पर्धे मध्ये मुलीन पासून अगदी वयस्कर महिलांनी सुद्धा भाग घेतला होता. सगळ्या जनींचा सहभाग बघून छान वाटले.स्पर्धेमध्ये अगदी पारंपरिक पदार्थ पासून अगदी पास्ता सुद्धा बनवला होता. तसेच महिलांनी उखाणे घेतले, भावगीत व भजन सुद्धा छान गायली.

Sakal Cooking Competition Arunodaya Society, Pune
Sakal Cooking Competition Arunodaya Society
Prize Distribution
Cooking Competition Prize Distribution
Sakal News Report
Sakal News Report
Cooking Competition Food Display
Food Display

पाककला स्पर्धे मध्ये प्रथम पारितोषिक मेथीच्या पापड्या, दुसरे पारितोषिक नाचणी लाडू, तिसरे पारितोषिक सुरलीची वडी व नाचणी डोसा ह्या पदार्थाला मिळाले.

अरुणोदय को-ऑपरेटीव्ह हौसिग सोसायटी पाक कला स्पर्धेचे परीक्षण करायला सुजाता नेरुरकर व उषा लोकरे यांना बोलावले होते.

एकंदरीत सकाळ न्यूजपेपर समुहाने महिलांसाठी छान स्पर्धे आयोजित केली होती. परत ह्या सोसायटी मधील बऱ्याच महिला नोकरी करत आहेत त्यामुळे सकाळ समूहानी त्यांचा रविवारचा सुटीचा दिवस बघून ही स्पर्धा आयोजित केली होती.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.