Healthy Muli Batata Paratha Recipe in Marathi

Muli Batata Paratha
Healthy Muli Batata Paratha

हेल्दी गाजर-मुळा पराठा: गाजर-मुळा पराठा चवीला खूप छान लागतो. गाजरामध्ये जीवनसत्व “ए” आहे. तसेच त्याच्या सेवनाने डोळ्यांना खूप फायदा होतो, त्यामध्ये लोह असल्यामुळे त्याच्या सेवनाने रक्त वाढते, रक्तशुद्धी होते व त्वचा रोग बरे होतात.

The English language version of the same Paratha recipe can be seen here – Potato-Mooli Paratha

बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ६ पराठे

साहित्य: सारणासाठी:
२ मध्यम आकाराचे मुळे
२ मध्यम आकाराचे गाजर
२ मोठे बटाटे (उकडून)
१” आले (किसून)
३ हिरव्या मिरच्या
१/४ कप कोथंबीर (चिरून)
१ टे स्पून तेल
१ टी स्पून जिरे
मीठ चवीने

आवरणासाठी:
२ कप गव्हाचे पीठ
१ टे स्पून तेल
मीठ चवीने

Muli Batata Paratha
Healthy Muli Batata Paratha

कृती: आवरणासाठी: गव्हाचे पीठ, तेल, मीठ व पाणी वापरून पीठ मळून घ्या.

सारणासाठी: बटाटे उकडून, सोलून, किसून घ्या.गाजर, मुळे धुऊन, किसून घ्या. आले किसून घ्या.
एका कढईमधे तेल गरम करून जिरे, हिरवी मिरची, आले व मीठ घालून किसलेले मुळे, गाजर घालून मिक्स करून कढईवर दोन मिनिट झाकण ठेवून एक वाफ आणा. कढई वरील झाकण काढून किसलेला बटाटा घालून मिक्स करून थोडे परतून घेऊन, चिरलेली कोथंबीर घालून मिक्स करून सारण विस्तवावरून उतरवून बाजूला ठेवा.

मळलेल्या पीठाचे एक सारखे १२ गोळे बनवून घ्या. दोन गोळे घेऊन पुरी प्रमाणे लाटून घ्या. एका पुरीवर दोन टे स्पून सारण पसरवून त्यावर दुसरी पुरी ठेवा. पुरीच्या कडा दाबून घेऊन पराठा लाटून घ्या.

नॉन स्टिक तवा गरम करून घेऊन त्यावर पराठा तेलाचा वापर करून छान खमंग भाजून घ्या. अश्या प्रकारे सर्व पराठे बनवून भाजून घ्या.

गरम गरम पराठा बरोबर टोमाटो सॉस सर्व्ह करा.

 

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published.