Why Should You Hang a Horseshoe at Your Main Door? 5 Amazing Benefits, Vastu Direction & Important Rules!
घराच्या मुख्य दरवाजावर घोड्याची नाल का लावतात? योग्य दिशा, नियम व चमत्कारी फायदे जाणून घ्या!
घराच्या मुख्य दरवाजावर घोड्याची नाल का लावावी? कारण काय? लाभ काय? नियम काय आहेत?
मुख्य दरवाजावर घोड्याची नाल लावण्याचे कारण काय? वास्तु शास्त्रा अनुसार योग्य दिशा, त्याचे लाभ व नियम काय आहेत ह्याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.
भारतीय परंपरा व वास्तु शास्त्रा नुसार घोड्याची नाल शुभ व शक्तिशाली प्रतीक मानले जाते. घोड्याची नाल ही फक्त एक प्रतीक नसून घराच्या ऊर्जाचे एक सुरक्षा कवच मानले जाते. घराच्या मुख्य दरवाजावर घोड्याची नाल लावणे ही एक खूप वर्षा पासून चालत आलेली परंपरा आहे. लोक घर, दुकान व व्यापाराच्या जागी बाहेर लावतात.
घराच्या दारावर घोड्याची नाल सजावटी नाही लावायची तर शास्त्र व लोक मान्यता अनुसार त्याच्या मागे धार्मिक व आध्यात्मिक कारण आहे ते आता आपण पाहू या.
घराच्या दरवाजावर घोड्याची नाल लावणे परंपरा:
भारतीय संस्कृति व वास्तु शास्त्र मध्ये घोड्याची नाल लावणे शुभ व सुरक्षाचे प्रतीक मानले जाते. असे म्हणतात की घोड्याची नाल मध्ये नकारात्मक शक्ति थांबवणे व सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याची क्षमता आहे. ह्या कारणा मुळेच घराच्या मुख्य दरवाजावर घोड्याची नाल लावली जाते.
वास्तु शास्त्र लोकमान्यतेनुसार मध्ये घोड्याची नालचे महत्व:
वास्तु शास्त्रा नुसार लोखंडाने बनवलेली घोड्याची नाल विशेष प्रभावशाली मानली जाते. त्याला शनि ग्रहाशी जोडले गेले आहे. म्हणूनच ते शनि दोष, बाधा म्हणजेच अडचणी व जीवनात येणारी रुकावट कमी करण्याच मदत करते. जुनी व वापरलेली घोड्याची नाल अधिक शुभ मानली जाते.
घोड्याची नाल लावण्याची योग्य दिशा:
वास्तु व लोकमान्यतेनुसार सांगितले जाते की घोड्याची नाल घराच्या मुख्य दरवाजावर कोणत्या प्रकारे लावावी. त्याची टोकाची बाजू नेहमी वरच्या बाजूला उघडी पाहिजे असे लावल्याने सकारात्मक ऊर्जा घराच्या आत प्रवेश करून घरातच राहते. दक्षिण किंवा पश्चिम दिशेला घराचे मुख्य दार असेलर त्यांच्या घरासाठी विशेष महत्वाचे मानले जाते.
घोड्याची नाल लावताना काही गोष्टी लक्षात घ्या:
नाल लावण्याच्या अगोदर पाहीले ती साफ करून घ्या. तुटलेली किंवा गंज लागलेली नाल लावू नये. असे म्हणतात की शनिवार ह्या दिवशी विधी पूर्वक लावणे अधिक शुभ फलदायी आहे.
ज्योतिष शास्त्र मध्ये घोड्याची नाल लावणे एक परंपरा नसून वास्तु शास्त्रशी जोडले गेलेला एक महत्वपूर्ण उपाय मानला जातो. योग्य दिशा व नियम वापरुन घोड्याची नाल घराच्या मुख्य दरवाजावर लावल्याने सकारात्मक ऊर्जा, सुख-समृद्धी व मानसिक शांती राहण्यास मदत होते.
घराच्या मुख्य दरवाजावर घोड्याची नाल लावल्याने काय होते? त्याचे नियम काय आहेत?
आपण पाहिले असेलच बरेच लोक घराच्या मुख्य दरवाजावर घोड्याची नाल लावतात, तसेच ज्या लोकांनी लावली नाही त्यांच्या मनात विचार येत असणार की त्याचे लाभ काय आहेत?
खर म्हणजे वास्तु शास्त्रा नुसार व लोकमान्यता अनुसार घोड्याची नाल खूप शुभ मानली जाते. असे म्हणतात की घराच्या मुख्य दारवजावर घोड्याची नाल लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. त्याच बरोबर सौभाग्य वाढते व घरात सुख-समृद्धी येते. पण ह्याचा लाभ तेव्हाच मिळतो जेव्हा ती नियमानुसार लावली जाते.

1. घोड्याची नाल घरासाठी एक शक्तिशाली सुरक्षा कवच मानले जाते. असे म्हणतात की घोड्याची नाल लावल्याने घराला कोणाची नजर लागत नाही.
2. जेथे घोड्याची नाल लावली जाते तेथे नकारात्मक ऊर्जा कधी सुद्धा प्रवेश करीत नाही. त्याच बरोबर शनि शी जोडलेले दोषा पासून मुक्ती मिळते.
3. घरात सारख्या अडचणी येत असतील व नुकसान होत असेलतर घोड्याची नाल जरूर लावावी. त्यामुळे दुर्भाग्य दूर होते.
4. नाल लावताना एक गोष्ट लक्षात ठेवा की नाल असली पाहिजे व जुनी नको कारणी बाजारात बनावट नाल सुद्धा मिळते. नाल लावताना U ह्या आकारात लावली पाहिजे त्याची उघडी बाजू वरच्या दिशेला पाहिजे.
5. नाल कधीसुद्धा शनिवार ह्या दिवशी किंवा अमावस्या ह्या दिवशी लावणे श्रेष्ठ मानले जाते. नाल लावताना शनि मंत्र जरूर म्हणावा.
6. नाल लावण्याच्या अगोदर नाल गंगाजलनि शुद्ध करून घ्या, त्याच बरोबर ती तुटलेली नसावी किंवा गंज लागलेला नसावा.
