दत्त जयंती 2026 विशेष! 3 डिसेंबरपासून सुरू करा 21 दिवसांची स्वामी सेवा, सर्व मनोकामना पूर्ण होतील!
Datta Jayanti 2026: Start This Powerful 21-Day Swami Seva from 3 December | Swami Samarth Blessings
दत्त जयंती 2026 21 दिवसांची अत्यंत प्रभावी स्वामी सेवा करा, अशक्यही शक्य करतील स्वामी सर्व मनोकामना पूर्ण होतील
आता ह्या वर्षी दत्त जयंती 23 डिसेंबर 2026 बुधवार ह्या दिवशी साजरी करायची आहे. आपल्याकडे दत्त जयंती ही खूप महत्वाची व शुभ मानली जाते. दत्त महाराज ह्यांची कृपा प्राप्त होण्यासाठी आपल्याला 21 दिवसांची प्रभावी सेवा करायची आहे. आपण ही प्रभावी सेवा केलीतर आपल्या घरात व परिवारात सुख-शांती येऊन आपल्या सर्व मनोकामना आपोआप पूर्ण होतील, त्यासाठी आपल्याला स्वामींची सेवा करून त्यांचा आशीर्वाद घेतला पाहिजे.
आपण 3 डिसेंबर 2026 गुरुवार पासून ही सेवा सुरू करू शकता, सेवा सुरू करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ आहे कारणकी ह्या दिवशी गुरुवार आहे. सेवा सुरू करण्यासाठी चांगला योग जुळून आला आहे. आता आपण कोणती सेवा करायची आहे? कधी पासून सुरू करायची आहे व कधी पर्यन्त करायची आजे ह्यांची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
आपण आधी ठरवले पाहिजे की कोणती सेवा करायची आहे.
1. गुरुचरित्र पारायण
2. तारक मंत्र
3. श्री गुरुदेव दत्त मंत्र जाप
4. श्री स्वामी समर्थ मंत्र जाप
5. श्री स्वामी चरित्र सारामृत
आपण कोणती सुद्धा सेवा करणार असाल तर त्याच्या अगोदर आपण ठरवले पाहिजे की आपण ही सेवा कोणत्या कारणासाठी करणार आहोत ते अगोदर निश्चित केले पाहिजे. आपल्याला माहिती असेलच स्वामी सेवा ही सर्वात प्रभवी सेवा आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणी, प्रश्न, संकट येत असतील तर स्वामी सेवा केल्यानी सर्व अडचणी दूर होतात किंवा आपल्या कोणत्या मनोकामना असतील तर त्या सुद्धा पूर्ण होतात. आपण स्वामी सेवा सुरू केली की आपल्याला लवकरच चांगली प्रचिती येते.
आपण कोणती सुद्धा सेवा सुरू करण्याच्या अगोदर संकल्प केला पाहिजे.
आता आपण पाहू या संकल्प कसा करायचा.
सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून स्वामींच्या फोटो किंवा मूर्ती समोर आसन घालून बसावे व स्वतः ला गंध लाऊन घ्यावे. एका तांब्यात पाणी घ्यावे व ताम्हण व पळी घ्यावी. मग हातात पळीने पाणी घेऊन आपल्या मनातील मनोकामना मनातल्या मनात बोलून म्हणजेच स्वामींना सांगून आपण ही सेवा मनोकामना पूर्ण होण्यासाठी किती दिवस करीत आहोत ते सांगावे. मग हातातील पाणी ताम्हणात सोडावे.
आपण पुढे दिलेल्या सेवा करू शकता:
1. गुरुचरित्र पारायण: आता 23 डिसेंबर 2026 ह्या दिवशी दत्त जयंती आहे. तर त्यासाठी आपण 21 दिवसांची स्वामींची सेवा करू शकता, त्यासाठी आपल्याला 3 डिसेंबर 2026 गुरुवार पासून सेवा सुरू करायची आहे ते 23 डिसेंबर 2026 बुधवार पर्यन्त 21 दिवसांची सेवा करायची आहे. गुरुचरित्र मध्ये एकूण 53 अध्याय आहेत. त्यामध्ये तीन विभगणी केली आहे. गुरुचरित्र मधील अध्यायांचे आपण एकदा पारायण करू शकता.
• ज्ञानकांड: अध्याय १ ते २४
• कर्मकांड: अध्याय २५ ते ३७
• भक्तिकांड: अध्याय ३८ ते ५३
2. आपण श्री स्वामी समर्थ ह्यांची सुद्धा खूप प्रभावी सेवा करू शकता. आपण रोज सकाळी लवकर उठून स्नान करून साफ कपडे परिधान करून श्री स्वामी समर्थ ह्यांची पूजा करून तारक मंत्र जाप करू शकता, तारक मंत्र जाप करताना आपण रोज 11 माळा किंवा 21 माळा जाप करू शकता किंवा आपल्या मनात जेव्हडा जाप करायचा आहे तेव्हडा करू शकता.
3. आपण “श्री गुरदेव दत्त” किंवा “श्री स्वामी समर्थ” ह्या मंत्रा जाप करू शकता. मंत्र जाप आपण रोज 11 किंवा 21 वेळा करू शकता किंवा त्यापेक्षा जास्त वेळा सुद्धा करू शकता.
4. आपण श्री स्वामी समर्थ ह्यांचे श्री स्वामी चरित्र सारामृत मधील रोज 21 अध्याय पठन करू शकता. आपण रोज 21 अध्याय पठन केलेकी आपले एक पारायण पूर्ण झाले. असे आपण 21 दिवस रोज एक पठन करू शकता म्हणजे आपले 21 दिवसांचे 21 वेळा पठन करू शकता.
आपल्याला रोज 21 अध्याय पठन करायला 1 तास ते सव्वा तास लागू शकतो. आपण सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी ही सेवा करू शकता.
आपल्याला रोज 21 अध्याय पठन करणे शक्य नसेलतर आपण रोज 7 दिवस 3 अध्याय वाचू शकता. आपल्याला जसे जमेल तसे सेवा करा, आपण मनोभावे सेवा केलीतर आपल्या सर्व मनोकामना स्वामी पूर्ण करतील.
5. आपण रोज एकवेळा तारक मंत्र, 11 माळा मंत्र जाप व श्री स्वामी चरित्र सारामृतचे वाचन करू शकता. आपल्याला जसे जमेल तसे करू शकता पण पहिल्या दिवशी संकल्प करून मग सेवा सुरू करा.
आपण 3 डिसेंबर पासून 23 डिसेंबर पर्यन्त 21 दिवस करू शकता, पण महिलांना मासिक पाळी मुळे सेवा करता येणार नाही तर आपण अगोदरच सेवा सुरू करू शकता. म्हणजे 3 डिसेंबरच्या अगोदर सुरू करू शकता.

आपल्याला श्री स्वामी समर्थ ह्यांची सेवा करायची असेलतर सोपे काही नियम पाळायचे आहेत.
* आपण ही सेवा सकाळी किंवा दिवस भरामद्धे कधी सुद्धा करू शकता. पण आपण रोज शक्यतो रोज नियमित त्याच वेळेला सेवा करावी. जर सकाळी स्नान झाल्यावर करणार असालतर रोज सकाळीच करा, किंवा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी करणार असाल तर संध्याकाळी करा, रोज वेळत बदल करू नका.
* सेवा करताना स्वामींच्या फोटो किंवा मूर्ती समोर बसून दिवा व आगरबती लाऊन आसन घालून बसावे. आपले आसन कोणाला सुद्धा वापरायला देवू नये.
* सेवा सुरू केली की मांसाहार करू नये. पण आपल्या घरातील व्यक्तिना पाहिजे असेलतर बनवून द्यावा पण स्वतः सेवन करू नये. आपली सेवा पूर्ण करून मगच बनवावा.
* सेवा करताना मासिक पाळी आली तर 4 दिवस सेवा करू नये जर घरातील व्यक्ति वाचन करू शकत असतील तर त्यांना वाचन करू द्यावे म्हणजे आपल्या सेवे मध्ये खंड पडणार नाही. जर सूतक असेलतर तेवहडे दिवस सेवा करू नये. आपण जर बाहेर गावी जाणार असालतर आपण बाहेर सुद्धा वाचन करू शकता. जर आपली मासिक पाळी ह्या 21 दिवसांच्या मध्ये येणार असेलतर आपण ही सेवा 3 तारखेच्या आता करू शकता किंवा दत्त जयंती झाल्यावर सुद्धा पूर्ण करू शकता.
* सेवा करताना शुद्ध विचार ठेवावे, कोणची सुद्धा निंदा करू नये. घरातील वातावरण आनंदी ठेवावे त्यामुळे घरात सकारात्मकता येते.
