Homemade Eggless Coconut Biscuits Recipe in Marathi

Eggless Coconut Biscuits
Homemade Eggless Coconut Biscuits

होममेड एगलेस कोकनट बिस्कीट: होममेड एगलेस कोकनट बिस्कीट हे बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहेत. कोकनट बिस्कीट बनवण्यासाठी मैदा, थोडे बटर अथवा वनस्पती तूप, व्ह्ननीला इसेन्स, डेसिकेटेड कोकनट वापरले आहे. कोकनट बिस्कीट आपण चहा बरोबर सुद्धा सर्व्ह करू शकतो. ही बिस्कीट चवीला खूप छान लागतात. ही बिस्कीट बनवतांना अंडे वापरले नाही.

कोकनट बिस्कीट बनवतांना मी वनस्पती तूप व बटर निम्मे-निम्मे असे प्रमाण घेतले आहे.

बनवण्यासाठी वेळ ६० मिनिट
वाढणी: ३० बिस्कीट बनतात

साहित्य:
१ १/२ कप मैदा
३/४ कप पिठीसाखर
१ कप वनस्पती तुप/ तेल/ बटर
१ टी स्पून बेकिंग सोडा
१/४ टी स्पून व्हनीला इसेन्स
१/४ कप डेसिकेटेड कोकनट
२ टे स्पून डेसिकेटेड कोकनट सजावटीसाठी

 Eggless Coconut Biscuits
Homemade Eggless Coconut Biscuits

कृती:
प्रथम मैदा व बेकिंग पावडर मिक्स करून चाळून घेवून बाजूला ठेवा.

एका मोठ्या बाउलमध्ये तूप/ तेल/ बटर व पिठीसाखर घेवून मिश्रण चांगले हलके होईस परंत फेटून घ्या. मग त्यामध्ये चाळलेला मैदा, व्हनीला इसेन्स, डेसिकेटेड कोकनट मिक्स करून हलक्या हातानी मळून घ्या.

मग मळलेल्या पीठाचे एक सारखे दोन गोळे बनवून घ्या. एक गोळा पोळपाटावर जाडसर लाटून घेऊन त्याचे एक सारखी गोल आकाराची बिस्कीट कापून घ्या. प्रतेक बिस्कीटवर वरच्या बाजूस डेसिकेटेड कोकनट लावून घेवून एका नॉन स्टिक माईक्रोवेव प्लेट मध्ये सर्व बिस्कीट मांडून घ्या.

माईक्रोव्हेव ओव्हन आधी कन्वेक्शन मोडवर प्रीहीट करून घेवून प्लेट आत रॅकवर ठेवून ओव्हन १८० डिग्रीवर कन्वेक्शन मोडवर १० मिनिट सेट करून चालू करा. १० मिनिट झाल्यावर परत ३-४ मिनिट कन्वेक्शन मोडवर चालू करून ठेवा. मग प्लेट बाहेर काढून बिस्कीट दुसऱ्या प्लेट मध्ये काढून ठेवा.

मग परत राहिलेली बिस्कीट बेक करून घ्या. सर्व बिस्कीट झाल्यावर थंड करून हवा बंद डब्यात भरून ठेवा.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

2 comments

  1. Thanks for the so easy recipe Mam, will definitely try.👌👌.
    Can you please tell me the cup measurements I mean 1 cup = 200 ml or what and another point while preheating microwave at what temperature & how much time.
    Will you please let me know at your earliest.
    Thanking you in advance.

  2. Set the microwave on convection mode for 3-4 minutes and start, after 3-4 minutes it will stop, then insert the non-stick plate on the rack and set for 10 minutes on convection mode at 180 Degrees.
    After it stops, set again for 3-4 minutes on convection mode and wheen it stops removee.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.