Tasty Pudina Sev Recipe in Marathi

पुदिना शेव: पुदिना शेव ही दिवाळी फराळासाठी बनवायला खूप छान आहे. आपण जशी पालकची शेव बनवतो तसेच पुदिन्याची शेव बनवा. ह्या शेवेला पुदिन्याची छान टेस्ट येते. तसेच रंगपण चांगला दिसतो.

The English language version of this Sev recipe and its preparation method can be seen here- Crispy Pudina Sev

बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: १०-१२ जणासाठी

साहित्य:
२ कप बेसन
१ पुदिना गड्डी
४ हिरव्या मिरच्या
१/४ कप बटर
१/४ टी स्पून हिंग
चिमुट हळद
मीठ चवीने
तेल पुदिना शेव तळण्यासाठी

Mint Sev

Pudina Sev

कृती:
प्रथम पुदिना गड्डी निवडून, धुऊन घ्या. मिक्सरमध्ये पुदिना पाने, हिरवी मिरची, १/४ कप पाणी घालून चांगली बारीक पेस्ट करून घेऊन गाळून घ्या.
एका परातीत बेसन व बटर मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये मीठ, हिंग, हळद घालून मिक्स करून पुदीनाचे पाणी घालून मिक्स करून शेवेचे पीठ चांगले मळून घ्या. शेवेच्या पिठाला तेलाचा हात लावावा.
शेव बनवण्यासाठी शेवेचा सोरया घेऊन बारीक भोक असलेली चकती लाऊन शेवेचे पीठ त्यामध्ये भरून घ्या.
कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये शेव घालून विस्तव मंद करा. दोनीही बाजूनी शेव कुरकुरीत तळून घ्या.
शेव थंड झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.

About Sujata Nerurkar (1895 Articles)
I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published.


*