Sev Tamatar Sukhi Bhaji Recipe in Marathi

शेव टोमाटोची सुखी भाजी: शेवेची भाजी  ही एक चवीस्ट सुखी भाजी आहे. दिवाळीच्या वेळेस फराळातील शेव जास्त शिलक राहिली तर त्या शेवेची छान भाजी बनवता येते. शेव बरेच दिवस तसीच राहिली तर अश्या प्रकारची भाजी बनवा.

This English language version of this Shev Sabji recipe and the preparation method can be seen here- Sev Tomato Bhaji

बनवण्यासाठी वेळ: २५ मिनिट
वाढणी: २ जणासाठी

साहित्य:
१ कप रतलाम शेव
१ टे स्पून तेल
२ मोठा कांदा
१ मोठा टोमाटो
१ टे स्पून आले-लसूण पेस्ट
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१/४ टी स्पून हळद
१ टी स्पून धने पावडर
१ टी स्पून गरम मसाला
२ हिरव्या मिरच्या
मीठ चवीने
कोथंबीर सजावटीसाठी

कृती:
कांदा, टोमाटो व कोथंबीर बारीक चिरून घ्या.
एका कढईमधे तेल गरम करून चिरलेला कांदा, टोमाटो, आले-लसूण पेस्ट घालून चांगले परतून घ्या. मग त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, धने पावडर, गरम मसाला, मीठ घालून मिक्स करून थोडे परतून घ्या. अर्धा कप पाणी घालून पाच मिनिट मंद विस्तवावर मसाला चांगला शिजू द्या. मसाला शिजला की अजून एक कप पाणी घाला व उकळी येऊ द्या. उकळी आल्यावर शेव घालून मिक्स करून विस्तव बंद करा. कढईवर झाकण ठेवा.
गरम गरम शेवेची भाजी चपाती बरोबर सर्व्ह करा.

About Sujata Nerurkar (1891 Articles)
I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published.


*