Schezwan Sev Recipe in Marathi

शेजवान शेव: शेजवान सॉस म्हंटले की आपल्याला चायनीज पदार्थ डोळ्या समोर येतात. शेजवान सॉसची शेव बनवायला अगदी सोपी आहे तसेच चवीला पण छान लागते.

The English language version of the Schezwan Sev recipe and its preparation method can be seen here- Crispy Schezwan Sev

बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: ८-१० जणासाठी

साहित्य:
४ कप बेसन
१/४ कप तेल (कडकडीत)
४ टे स्पून शेजवान सॉस
मीठ चवीने(मीठ जरासे घाला कारण की सॉस मध्ये मीठ असतेच.)
तेल शेव तळण्यासाठी

Schezwan Sauce Sev

Schezwan Sev

कृती:
बेसन व मीठ चाळणीने चाळून घेऊन त्यामध्ये शेजवान सॉस घालून मिक्स करा. नंतर त्यामध्ये गरम तेल घालून मिक्स करून पाणी वापरून पीठ मळून घ्या. पीठ चांगले मळून घ्या.
कढईमधे तेल गरम करून घ्या. सोरयामध्ये शेवेचे पीठ भरून बारीक भोकाची चकती लावा व गरम तेलामध्ये सोरयाच्या सहायाने गोलाकार शेव घाला. शेव घालतांना विस्तव मोठा ठेवा शेव घातली की विस्तव लहान करा. अश्या प्रकारे सर्व शेव बनवून घ्या. थंड करायला पेपरवर ठेवा.
मग प्लास्टिकच्या पिशवीत भरून घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.

About Sujata Nerurkar (1848 Articles)
I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published.


*