Gajarachi Shankarpali Recipe in Marathi

गाजराचे शंकरपाळे: शंकरपाळे म्हंटले की आपल्या डोळ्या समोर गोडाचे शंकरपाळे व खारे शंकरपाळे येतात. गाजराची शंकरपाळी  चवीला उत्कृष्ट लागतात. हे शंकरपाळे बनवतांना गव्हाचे पीठ वापरले आहे. गव्हाचे पीठ हे किती पौस्टिक आहे ते आपल्याला माहीत आहेच. बडीशेप मुळे चव पण चांगली येते. गाजरामुळे शंकरपाळी छान लागते.

The English language version of this Shankarpali recipe and the preparation method can be seen here – Carrot Shankarpali

बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी

साहित्य:
२ कप लाल गाजर (किसून)
४ कप गव्हाचे पीठ
१ कप दुध (उकळून घट्ट)
१ टे स्पून तेल
१ टी स्पून बडीशेप
मीठ चवीने
तेल शंकरपाळे तळण्यासाठी

Carrot Shankarpali

Gajarachi Shankarpali

कृती:
गाजर धुवून किसून मिक्सरमध्ये वाटुन घ्या. गव्हाचे पीठ, गाजर, गरम तेल, मीठ, सोडा-बाय-कार्ब व बडीशेप मिक्स करून त्यामध्ये उकळलेले दुध व लागेल तसे पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या. मळलेले पीठ १५-२० मिनिट बाजूला ठेवा. मग त्याचे एक सारखे चार गोळे बनवून घ्या.
एक गोळा घेऊन तो पोळी सारखा लाटून घ्या. मग सुरीने त्याचे शंकरपाळे कापून घ्या. किंवा लहान डब्याच्या झाकणाने गोल गोल कापून त्याला मध्ये पीळ द्या. अशे सर्व गोळे लाटून शंकरपाळे कापून घ्या.
एका कढईमधे तेल गरम करून शंकरपाळे गुलाबी रंगावर तळून घ्या. तळलेले शंकरपाळे थंड झाल्यावर प्लास्टिक पिशवीत भरून घट्ट झाकणाच्या डब्याच्या भरून ठेवा.

About Sujata Nerurkar (1932 Articles)
I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published.


*