Crispy Andyache Kabab Recipe in Marathi

अंड्याचे कबाब: अंड्याचे कबाब ही एक टेस्टी डीश आहे. एग कबाब हे आपण स्टारटर म्हणून किंवा नाश्त्याला बनवू शकतो. पुण्यामध्ये ह्या डीशला अंड्याचे कबाब व मुंबईला बैद्याचे कबाब म्हणतात.
अंड्याचे कबाब बनवतांना सारणासाठी उकडलेले अंडे, मिरे पावडर, मीठ व पुदिना वापरला आहे. मिरे पावडर ही थोडी जाडसर घालायची त्याने छान चव येते. पुदिना चिरून वापरला आहे त्यामुळे कबाबला चांगली टेस्ट येते व छान सुंगध येतो.
अंड्याचे कबाबाचे आवरण हे उकडलेल्या बटाट्याचे आहे त्यामध्ये चवीसाठी आले-हिरवी मिरची पेस्ट वापरली आहे व ब्रेडचा चुरा वापरला आहे. त्यामुळे कबाब छान कुरकुरीत होतात व फुटत नाहीत.

The English language version of this Egg Kebab preparation method can be seen here- Tasty Anda Kabab

बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ८ कबाब

साहित्य:
आवरणासाठी:
४ मध्यम आकाराचे बटाटे (उकडून)
१ टे स्पून आले-हिरवी मिरची पेस्ट
२ ब्रेड स्लाईस (चुरा करून)
१/२ टी स्पून लिंबूरस
मीठ चवीने

सारणासाठी:
२ अंडी (उकडून)
१/४ टी स्पून मिरे पावडर (जाडसर)
१ टे स्पून पुदिना पाने (चिरून)
मीठ चवीने

Crispy Tasty Egg Kabeb

Eggs Kabab

कृती: बटाटे व अंडी उकडून घ्या. ब्रेडचा चुरा करून घ्या.

आवरणासाठी: बटाटे उकडून, सोलून किसून घ्या. मग त्यामध्ये आले-हिरवी मिरची पावडर, लिंबूरस, ब्रेडचा चुरा, मीठ घालून चांगले मळून घेवून त्याचे आठ एकसारखे भाग करा.

सारणासाठी: अंडी उकडून, सोलून त्याचे छोटे तुकडे करून घ्या. मग त्यामध्ये मिरे पावडर (जाडसर), मीठ व चिरलेला पुदिना पाने घालून मिक्स करून घ्या व त्याचे एकसारखे आठ भाग करा.

कबाब बनवण्यासाठी: बटाट्याचा एक भाग घेवून हातावर थापून त्याचा वाटी सारखा आकार बनवून त्यामध्ये उकडलेल्या अंड्याच्या सारणाचा एक भाग घेवून ठेवून गोळा बंद करावा. असे सर्व कबाब बनवून घ्यावेत.
एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये बनवलेले कबाब छान कुरकुरीत तळून घ्यावेत.

गरम गरम अंड्याचे कबाब टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह करावेत.

About Sujata Nerurkar (1961 Articles)
I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published.


*